माझं नाव केतन सावंत. राहणार महाराष्ट्र. लहानपणापासून इतिहासाची असलेली आवड आता अजूनच वाढली त्यातून पहिली कादंबरी १२ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली.
हा ब्लॉग आधी ललित लेख, कविता ह्या पासून सुरुवात करून आता इतिहासावर आधारित कथांचा धांडोळा घेण्यासाठी त्याचा वापर करणार आहे.
पुराव्याशिवाय कुठलहि कथन करणार नाही. वा. सी. बेंद्रे, ग. ह. खरे, निनादराव बेडेकर, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्या इतिहासाच्या आचार्यांनी उचलेल्या ह्या गोवर्धनाला जमेल तशी काठी लावून त्यांच्या कार्यात खारीचा वाट उचलण्याचा प्रयत्न नेहमीच असेल. धन्यवाद!